साध्या वेबसाईटचे डिझाईन भाग - २
Category: वेबसाईट डिझाईन
पहिला धडा तुम्ही प्रत्यक्ष करून पाहिला असेल तर तुम्ही टाईप केल्याप्रमाणे वेबपेज वर का दिसत नाही असा प्रश्न पडला असेल.
येथे सर्व शब्द एकाच ओळीत आलेले दिसतात. याचे कारण की ओळ बदलण्यासाठी लागणारा BR टॅग आपण दिला नव्हता. secondpage.htm आता नोटपॅडमध्ये खाली दाखविल्याप्रमाणे टाईप करा.
एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की दुसर्या प्रोग्रॅममध्ये दुसर्या लिपीत सर्व टॅग लिहिले आहेत. याचा अर्थ असा की कॅपिटल वा स्मॉल अशा दोन्ही प्रकारच्या अक्षरांचा प्रोग्रॅममध्ये वापर केला तरी चालतो.
दुसरे पान secondpage.htm या नावाने सेव्ह करा.
ब्राउजरमध्ये दुसरे पान कसे दिसेल हे खाली दाखविले आहे.




