न्यूटन ॲपल ट्री
Category: Uncategorised
![]() |
| साडेतीनशे वर्षांपूर्वी (इ. स. 1665 - 1665च्या सुमारास) ब्रिटीश शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन याला सफरचंदाच्या झाडाखाली बसला असताना डोक्यावर सफरचंद पडल्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्याची प्रेरणा मिळाली असे मानले जाते.
त्या झाडापासून लावलेल्या रोपांना विज्ञानाच्या इतिहासात मोलाचे स्थान आहे. न्यूटनच्या ‘साक्षात्कारी’ सफरचंदाच्या झाडाचे वंशज आणि क्लोन जगभरात अनेक देशांमध्ये पोहोचले आहेत. केम्ब्रिजमधील न्यूटनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्येही अशा प्रकारचे एक झाड आहे. लिंकनशायर येथील न्यूटनच्या मूळ घरालगतही हे झाड वाढवण्याचे प्रयत्न झाले आहेत. ख्यातनाम शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी १९९७मध्ये ते आययूसीएएचे संचालक असताना न्यूटनचे झाड भारतात लावण्यासाठी पुढाकार घेतला होता. वाईजवळील पसरणी गावातील बापू भिलारे यांनी २०२३ मध्ये काश्मीरहून सफरटंदाची रोपे आणून दोन एकरात सफरचंदाची बाग उभी केली. त्याबाबतची बातमी वाचल्यावर ज्ञानदीपचे अध्यक्ष डॉ. सु. वि. रानडे यांनी यांनी श्री बापू भिलारे यांच्या पसरणी येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच त्यांनी तयार केलेली सफरचंदाची रोपे विकत घेतली. आता सर्व शाळांत न्यूटनच्या विज्ञानसंशोधनाचे प्रतीक म्हणून अशी रोपे लावण्याचा प्रकल्प ज्ञानदीप फौंडेशनने हाती घेतला असून त्यास सर्व शाळांनी सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी स्कूल फॉर ऑल डॉट ओआरजी आणि विज्ञान डॉट नेट या ज्ञानदीपच्या वेबसाईटला भेट द्यावी ही विनंती |






