मित्र जीवाणू

सध्या विविध प्रकारच्या आजाराच्या साथी चालू आहेत. नवनवीन रोगाचे जीवाणू आढळून येत आहेत. प्रतिजैविके निष्प्रभ होत आहेत.अशा वेळेला आपल्या पचनसंस्थेत असणा-या मित्र जीवाणूंची माहिती घेणे खूपच गरजेचे आहे.

या मित्र जीवाणूंमुळे आपले पचन चांगले होते,आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते.अनेक प्रकारचे कर्करोग, आतड्याचे विकार, एलर्जी यांना तोंड देता येते.

मित्र जीवाणू आपल्या शरीरात येतात कसे? त्यांना सांभाळायचे कसे? जोपासायचे कसे? त्यांना घातक गोष्टी कोणत्या? त्या आपण कशा टाळू शकतो? यासारख्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग यांचे वतीने पुण्यात विविध ठिकाणी पोस्टर प्रदर्शने आयोजित करण्यात आली.

सोबत पचन संस्थेतील मित्र जीवाणू या विषयावरील एक PDF फाईल दिली आहे. आपल्याला योग्य वाटल्यास फ्लेक्स करून छापून घेऊन त्याचे प्रदर्शन मांडावे. तिचा वापर मुक्तपणे करावा.

सौजन्य - मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030