भास्कराचार्य गणित - भाग ४

लीलावती ( पाटीगणित) प्रकरण - ४
गुणनप्रकार ( गुणाकाराच्या पद्धती )
या प्रकरणात दोन श्लोक ( १५ व १६) आणि एक अर्धा श्लोक आहे.

श्लोक-१५
गुण्यांत्यमंकं गुणकेन हन्यात् । उत्सारितेनैवमुपान्त्यमादीन् ॥
गुण्यस्त्व्धोऽधो गुणखण्डतुल्यः । तैः खण्डकैः संगुणितो युतो वा ॥ १५ ॥


श्लोक-१६
भक्तो गुणाः शुद्धति येन तेन । लब्ध्या च गुण्यो गुणितम् फलं वा ॥
द्विधा भवेद्रूपविभाग् एवं । स्थानेः पृथग्वा गुणितः समेतः ॥ १६ ॥


अर्धा श्लोक
इष्टोनयुक्तेन गुणेन निघ्ने । ऽभीष्टघ्नगुण्यान्वितवर्जितो वा ॥

वरील श्लोकात गुणाकाराच्या पाच पद्धती सांगितल्या आहेत्. त्या खाली दिल्या आहेत.

रूपगुणरीत -
गुण्य म्हणजे जिला गुणावयाचे त्या संख्येच्या अंत्य अंकास म्हणजे एकं स्थानच्या अंकास गुणक संख्येने गुणावे. नंतर गुणकांकाने उपान्त्य म्हणजे दहं स्थानच्या अंकास गुणावे. याप्रमाणे आदिम अंकापर्यंत करावे. या पद्धतीला रूपगुणरीत म्हणतात.
खंडगुणरीत -
गुणकाचे खंड किंवा विभाग करून प्रत्येक खंडाने गुण्यास गुणून गुणाकार एकाखाली एक लिहून बेरीज करावी.
विभागगुणरीत -
गुणक संख्येचे अवयव पडत असतील तर एका अवयवाने प्रथम् गुणून नंतर येणार्‍या गुणाकारास उरलेल्या अवयवाने गुणावे.
स्थानगुणनरीत -
गुणकांत जितकी स्थाने असतील त्या त्या अंकांनी गुण्यास स्वतंत्र रीतीने गुणून त्या त्या स्थानाखाली ते गुणाकार लिहून बेरीज करावी.
इष्टांक वजा करण्याची किंवा मिळविण्याची रीत.
दिलेल्या गुणकांतून एक सोयीस्कर अंक वजा करावा व उरलेल्या संख्येने गुण्यास गुणावे व त्यांत इष्टांकाचा व गुण्याचा गुणाकार् मिळवावा. किंवा गुणकांत एक सोयीस्कर अंक मिळवून त्याने गुण्यास गुणावे व त्यातून इष्टांक व गुण्य यांचा गुणाकार वजा करावा.

श्लोक् – १७
बाले बालकुरंगलोलनयने लीलावति प्रोच्यताम्‌ ।
पंचत्र्येकमिता दिवाकरगुणा अंकाः कति स्युर्यदि ॥
रूपस्थानविभाग