ध्वनिविभाग

ध्वनिविभागात खालील पोटविभाग आहेत.
१. शब्द ( नामे), सर्वनामे यांची सर्व विभक्तिरुपे लिहून व प्रत्यक्ष म्हणून दाखविली आहेत .
२. धातूंची वर्तमानकाळ, प्रथम ( अनद्यतन) भूतकाळ, आज्ञार्थ व विध्यर्थ अशा चारही काळातील सर्व रुपे लिहून व प्रत्यक्ष म्हणून दाखविली आहेत.
३. दोनशे सुभाषिते व त्यांचा मराठीतील अर्थ दिला असून सुभाषिते म्हणून दाखविली आहेत.
४. श्री गणेशस्तुती, अच्युताष्टक, अथर्वशीर्ष, रामरक्षा, नवग्रहस्तोत्र अशी पाच स्तोत्रे लिहून व प्रत्यक्ष म्हणून दाखविली आहेत.
ध्वनिविभाग वापरण्यासाठी सूचना -
शब्द, सर्वनाम, धातू, सुभाषित वा स्तोत्रे यापैकी आवश्यक तो पर्याय योग्य त्या बटनावर क्लिक करून निवडावा. सर्व शब्दांची वा अन्य यादी स्क्रीनवर दिसू लागेल. त्यातील आवश्यक पर्यायावर क्लिक केले की सर्व माहिती व ध्वनिपट्टी दिसू लागेल. त्यावर क्लिक केले की आवाज ऎकू येईल. धातू विभागात आधी आवाज बटनावर क्लिक करावे व नंतर ध्वनिपट्टीचा वापर करावा.