टर्टल ग्राफिक्स

लोगो (LOGO)ही मुलांसाठी संगणकावर आकृत्या काढण्यासाठी तसेच त्याद्वारे कॉम्युटर प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकविण्यासाठी तयार केलेली संगणक प्रणाली आहे.
टर्टल ग्राफिक्स (Turtle Graphics)ही संगणक प्रणाली लोगो (LOGO) या प्रोग्रॅमिंग लँग्वेजवर आधारित असून ती इंटरनेटवर वापरता येते.

शेजारच्या चित्रातील उजव्या बाजूला वरच्या कोपर्‍यात असलेल्या i या बटनावर क्लिक केले की माहिती तक्ता दिसतो.x या बटनावर पुन: क्लिक केल्यास माहिती तक्ता जाऊन आकृत्या काढण्यासाठी पूर्ण स्क्रीन मोकळा होतो.


आज्ञा:
ad X : Advance X turtle units ( X एकक पुढे जा)
re X : Reverse X turtle units ( X एकक मागे जा)

ri X : Turn right X degrees ( X अंशात उजवीकडे वळा)
le X : Turn left X degrees ( X अंशात उजवीकडे वळा)

rise : Rise the pencil ( पेन्सिल वर उचला. )
lower : Lower the pencil ( पेन्सिल कागदावर टेकवा. )

rep X : Repeat X times the next commands ( पुढील आज्ञा त्याच क्रमाने X वेळा करा)
clr : Clear everything and start over ( सर्व स्क्रीन पुसून टाका व नव्याने आकृती काढण्यास सुरुवात करा.)

उदाहरणार्थ चौकोन काढणे.
खालच्या पट्टीत > अशा चिन्हाच्या पुढे ad 50 टाईप करा. ad 50 टाईप केले की उभी रेघ दिसू लागेल. उजवा बाजूस वळण्यासाठी ri 90 टाईप करा व पुन: ad 50 टाईप करा. पुन: ri 90 टाईप करा व पुन: ad 50 टाईप करा. पुन: ri 90 टाईप करा व पुन: ad 50 टाईप करा. पुन: ri 90 टाईप करा व पुन: ad 50 टाईप करा.आता चौकोन तयार होईल. या आज्ञा देताना UP आणि DOWN या कीबोर्ड्वरील KEYचा उपयोग करून मागील आज्ञा देता येतात.
वरील सर्व आज्ञा एकाच ओळीवर दिल्या तरी चालतात.उदा. चौकोन काढण्यासाठी अशी आज्ञा देता येईल
ad 50 ri 90 ad 50 ri 90 ad 50 ri 90 ad 50
rep, rise, lower या आज्ञांचा उपयोग करून अनेक चौकोनांचे डिझाईन काढता येईल टर्टल ग्राफिक्स वेबसाईटवर प्रत्यक्ष आकृत्या काढा.