एसव्हीजी ( व्हेक्टर ग्राफिक्स)

एसव्हीजी (SVG) म्हणजे स्केलेबल व्हेक्टर ग्राफिक्स ( आकार कमी जास्त करता येणार्‍या भौमितिक आकृत्या). कॉम्प्युटरवर आकृत्या काढण्यासाठी उपयुक्त असणारी ही सुविधा इंटरनेटवर मोफत उपलब्ध असून त्याचा उपयोग करून आपल्याला हव्या तश्या रंगीत आकृत्या अगदी सोप्या पद्धतीने काढता येतात व त्या SVG किंवा PNG स्वरुपात आपल्या कॉम्प्युटरवर (SAVE) जतन करता येतात. या पद्धतीचा आणखी एक महत्वाचा गुणविशेष म्हणजे आढलेल्या आकृतीचा प्रोग्रॅम स्क्रिप्ट स्वरुपात साठविला जात असल्याने त्यास अगदी कमी जागा लागते.

एसव्हीजी सुविधा आपल्याला http://code.google.com/p/svg-edit/ येथून डाऊनलोड करता येते. यातील svg-editor.html हे वेबपेज ब्राउजरमध्ये उघडल्यास खालील स्क्रीन दिसतो.

केवळ माऊसच्या साहाय्याने पेन्सिल, रेघ, चौकोन, वर्तुळ यासारख्या टूल्सचा (साधनांचा)वापर करून आकृत्या काढता येतात. त्यात रंग भरता येतो. त्याच्या अनेक प्रती काढून त्या हलविता वा कशाही वळविता येतात. असेच एक चित्र नमुन्यासाठी खाली दाखविले आहे.

आता या चित्राचा प्रोग्रॅम आपल्याला लगेच पाहता येतो. तो खाली दाखविला आहे. त्यात बदल करूनही चित्र बदलता येते.