top
logo


Valid CSS!

Home ज्ञानदीप फौंडेशन
ज्ञानदीप फौंडेशन पीडीएफ़ प्रिंट ई-मेल

ज्ञानदीप एज्युकेशन अँण्ड रिसर्च फौंडेशन,
१८, शिल्प चिंतामणी सोसायटी, विजयनगर,
पोस्ट-वानलेसवाडी, सांगली - ४१६४१४

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन व ज्ञान प्रसार करण्याच्या उद्देशाने ज्ञानदीप एज्युकेशन अँण्ड रिसर्च फौंडेशन, सांगली ही सार्वजनिक विश्वस्त संस्था २००५ मध्ये स्थापन करण्यात आली. संस्थेची मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा ( १९५०) अन्वये नोंदणी करण्यात आली असून नोंदणी क्रमांक ई-१५३०/सांगली हा आहे.

उद्दिष्टे-

माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करून लोकशिक्षण, विज्ञान प्रसार आणि रोजगार निर्मिती करणे.
भाषा, धर्म, स्थान यामुळे निर्माण होणार्‍या अडथळयांना पार करून ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविणे. वेबसाईट व संगणक प्रणाली विकसित करणे व त्यातून भारतात राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी यासाठी प्रयत्न करणे.
इंटरनेटवर मिळणार्‍या ज्ञानाचा स्रोत वापरून भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ज्ञान वितरित करणार्‍या व्यक्तींचे संघटन करणे व अशी ज्ञानप्रसार केंद्रे उभारणे.
माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी शाळा, महाविद्यालय व संशोधन प्रयोगशाळा, तसेच ग्रंथालय उभारणे व शैक्षणिक पोर्टल वेबसाईट तयार करणे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन संस्थांशी विविध विषयावरील दूरस्थ शिक्षणासाठी सहकार्य करणे.
विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीची माहिती देण्यासाठी परिसंवाद, प्रशिक्षण शिबिरे व प्रदर्शने आयोजित करणे तसेच जनमानसात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे.
परदेशात राहणार्‍या भारतीयांपर्यत येथील साहित्य व संस्कृती पोहोचविणे व त्यांच्याकडून भारताच्या प्रगतीसाठी साहाय्य मिळविणे.
माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतास सशक्त राष्ट्र बनविणे आणि जागतिक मानवकल्याणासाठी ज्ञानप्रसार करण्यात भारताला अग्रेसर करणे.
वरील उद्दिष्टांस पूरक ठरतील असे अन्य कार्यक्रम घेणे वा त्यात सहभागी होणे.

कार्य -

ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. सांगली या वेबसाईट व सॉफ्टवेअर विकसित करणार्‍या संस्थेने फौंडेशनच्या कामास सहकार्य म्हणून खालील वेबसाईट निर्माण करून दिल्या आहेत.

संस्कृत शिक्षणासाठी www.sanskritdeepika.org
विज्ञान शिक्षणासाठी www.vidnyan.net
मराठी साहित्य व संस्कृती जगभर पोहोचविण्यासाठी www.mymarathi.com
सांगली शहराची सर्व माहिती मराठीतून देणारी वेबसाईट www.mysangli.com
कोल्हापूर शहराची सर्व माहिती मराठीतून देणारी वेबसाईट www.mykolhapur.net
दूरस्थ शिक्षण व विविध शिक्षणसंस्थांना माहिती तंत्रज्ञानाच्या सुविधा पुरविण्यासाठी www.dnyandeep.net

फौंडेशनने आतापर्यंत मराठीतून विज्ञानप्रसारासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले असून पर्यावरण व बांधकाम क्षेत्रासाठी खालील परिसंवाद घेतले आहेत.

यूज ऑफ सोलर एनर्जी इन बिल्डींग (सूर्यशक्तीचा घरबांधणी क्षेत्रात वापर)
ग्रीन बिल्डींग डिझाईन (हरित गृहरचना)
ड्रीम ऑफ ग्रीन सिटी (स्वप्न हरित नगरीचे)
ग्रीनटेक २००९

ज्ञानदीप एज्युकेशन ऍण्ड रिसर्च फौंडेशन अनेक शाळा, महाविद्यालये व इतर संस्थांशी शिक्षण, संशोधन तसेच समाज प्रबोधनासाठी सहकार्य करीत आहे. सध्या मराठीतून व काही विशिष्ट विषयात कार्य सुरू असले तरी सर्व भारतीय भाषांमध्ये हे कार्य वाढविण्याचा संस्थेचा मनोदय आहे.

संस्थेच्या या कार्यात आपण सक्रीय सहभाग घ्यावा तसेच सढळ हाताने आर्थिक मदत करावी ही विनंती. आपणा सर्वांच्या सहकार्याने ही संस्था माहिती तंत्रज्ञानाचे फायदे सर्व भारतीयांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यात यशस्वी होईल अशी खात्री वाटते.

 

Statistics

सदस्य : 47
मजकूर : 593
वेब लिंक्स : 4
मजकूर पाहिलेल्या हिट्स : 245818

bottom
Designed by: Free Joomla Themes, hosting. Valid XHTML and CSS.